धन धान्याने समृध्द करणारी एकादशी. " षटतिला एकादशी " २० जानेवारी २०२०


धन धान्याने समृध्द करणारी एकादशी.

 " षटतिला एकादशी "

Yekadashi

 

भगवान श्री कृष्णांच्या मुखाने एकादशीचे माहात्म श्रावण केल्यावर त्यांना श्रद्धापूर्वक नमन करून अर्जुन म्हणाला - हे केशव ! आपण सांगितलेल्या एकादशीच्या कथा ऐकल्यावर मला खूप आनंद झाला आहे. हे मधुसूदन ! कृपा करून मला बाकीच्या एकादशी बद्दल माहिती सांगण्याची कृपा करावी.

" हे अर्जुन ! आता मी माघ मासातील कृष्णपक्षातील षटतिला एकादशी व्रता बद्दल सांगतो आहे.



एकवेळी दालभ्य ऋषीमुनींनी पुलस्त्य ऋषीमुनींना विचारले - हे श्रेष्ठ मुनी ! मनुष्य मृत्यू लोकांत  ब्रह्महत्या, भूणहत्या, चोरी , दुसऱ्याच्या उन्नती बद्दल ईर्षा इत्यादी महापाप करीत आहेत. हे महापाप सर्व क्रोध, ईर्षा आणि न विचार करीता अजाणतेपोटी किंवा जाणूनबुजून करीत आहेत. तदनंतर हे महामुनी ! मी हे काय केले याचे दुःख करीत बसतात. अश्या या मानवांना नर्क प्राप्ती तर नक्कीच होणार. तरी हे महामुनी अश्या या मानवांना नरकात जाण्यापासून वाचविण्या करिता काही उपाय आहे का ? असा काही उपाय ज्यामुळे मानवाला नरकात जाण्यापासून बचाव होईल म्हणजेच नर्क प्राप्ती होणार नाही.  असे कोणते दान, पुण्य किंवा कर्म ज्यांच्या प्रभावामुळे नरकात होणाऱ्या यातनांपासून ( त्रासापासून )  मुक्तता मिळेल ? या सर्व समस्यांवर काही तरी उपाय आपण कृपा करून सांगावे हीच विनंती आहे.

दालभ्य ऋषीमुनींचे हे वचन ऐकताच पुलस्य ऋषीमुनींनी म्हटले - " हे श्रेठ मुनी ! आपण विचारलेला प्रश्न अत्यंत रहस्यमय आहे. या मुले विश्वातील सर्व मानवांना याचा खूपच लाभ होईल. जे रहस्य आज पर्यंत इंद्रादी देव आणि इतर प्राणिमात्र यांना सुध्दा माहित नाही. ते रहस्य मी तुम्हाला अवश्य सांगेन. माघ महिना आल्यावर मानवाने स्नानादी सर्व कर्मे केले पाहिजे आणि आपल्या सर्व इंद्रियांवर अंकुश लावला पाहिजे. अहंकार, ईर्षा, लोभ, मोह, माया, क्रोध, तसेच काम ( काम वासना) या सर्वांपासून वंचित ( दूर ) राहावे लागेल.

पुष्य नक्षत्रामध्ये गाईचे शेण, कापूस, कापुर आणि तीळ यांच्या पासून गोवऱ्या तयार करायला पाहिजेत. या गोवऱ्याचा उपयोग १०८ वेळा होम हवन करण्याकरीता केला पाहिजे.

ज्या दिवशी मूळ नक्षत्र आणि एकादशी तिथी असेल तेव्हा चांगले पुण्य देणाऱ्या यम नियमांचे  पालन केले पाहिजे. स्नानादी नित्य कर्मांनी देवाचे देव परमेश्वर श्री हरी यांचे पूजन आणि किर्तन केले पाहिजे.

एकादशीच्या दिवशी उपवास करावा तसेच रात्रसमयी होमहवन आणि जागरण करावे. दुसऱ्या दिवसाला धूप,दीप नैवेद्य घेऊन श्री हरीची पूजा अर्चना करावी तसेच त्यांना भोग लावावा. त्या दिवशी श्री विष्णूंना पेठा, नारळ, सीताफळ किंवा सुपारी समवेत अर्ध्य अवश्य द्यावे, त्यानंतर त्यांची स्तुती करावी - हे जगदीश्वर ! आपण निराधारांना आधार देणारे आहेत. आपण या संसाररूपी सागरामध्ये बुडालेल्याचा उध्दार करणारे आहेत. हे कमलनयन ! हे मधुसूदन ! हे जगन्नाथ ! हे नारायणा ! आपण लक्ष्मीमाते सहित या तुच्छ जीवाचे अर्ध्य स्विकार करावे हीच विनंती आहे. यानंतर पाण्याने भरलेला घडा आणि तीळ दान केले पाहिजेत. जर यथा शक्ती चांगली असेल तर गौ (गाय ) आणि तीळ दान केले पाहिजे. या प्रकारे मानव जेवढे तिळाचे दान करतो आहे तितकेच सहस्त्र वर्षे स्वर्गामध्ये वास करतो.



तिळाने स्नान
तिळाचे उटणे
तिळाचे नाम ( गंध )
तिळाचा होम हवन
तिळाचे भोजन
तिळाचे दान



अश्या प्रकारे ६ रूपाने तिळाचा उपयोग केला तर त्याला षटतिला म्हणतात. याच्याने अनेक प्रकारच्या पापांचा नाश होतो. एवढे सांगून पुलस्य मुनींनी म्हटले - आता मी एकादशी ची कथा सांगतो आहे.

            एकदा नारद मुनींनी भगवान श्री हरी यांना षटतिला एकादशीचे माहात्म्य विचारले. ते म्हणाले - हे मधुसूदना ! आपण माझा प्रणाम स्विकार करा. षटतिला एकादशीच्या उपवासाचे पुण्य काय आहे ? त्याची काय कथा आहे ? कृपा करून आपणाला मला सांगण्याची विनंती आहे. तरी माझ्या वर कृपा करा.

नारद मुनिनिची हि विनंती ऐकून श्रीहरी विष्णू हे म्हटले - हे नारद ! मी तुमच्या वात्सल्याने प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला जी खरोखर घडलेली सत्य कथा आहे ती तुम्हाला सांगतो आहे. ती तुम्ही व्यवथित मनपूर्वक श्रवण करा.












खूप वर्षांपूर्वी मृत्यूलोकांमध्ये एक ब्राह्मण स्त्री राहत होती. ती सदैव उपवास-व्रत करत असे. एक वेळा तिने सतत एक महिनाभर उपवास केला. त्या उपवासामुळे ती खूप क्षीण झाली. तिच्यातील शारीरिक ताकद कमी झाली. तशी ती खूप,अत्यंत बुध्दिमान होती. तरीही तिने कधी व्रतवैकल्प याकरिता, देव, ब्राह्मण इत्यादी ना कधीच कोणत्याही कारणासाठी किंवा दान म्हणून अन्नादि दान केले नाही. नंतर मी विचार केला कि या ब्राहमण स्त्री ने उपवास,व्रत इत्यादी करून आपले शरीर तर पवित्र केले आहे. त्या मुळे तिला वैकुंठ लोक पण प्राप्त होईल. परंतु तिने कधी अन्नदान केले नाही. अन्ना शिवाय कोणत्याही जीवात्म्याची तृप्ती होणे कठीणच असते. हा विचार करून मी मृत्यूलोकांत गेलो आणि त्या ब्राह्मण स्त्री ला भिक्षा मागितली. त्यावर त्या ब्राह्मण स्त्री ने मला विचारले - हे योगीराज ! आपले इथे येण्याचे कारण काय आहे ? मी म्हणालो - भिक्षाम देही,  मला भिक्षा द्या. त्यानंतर तिने मला एक मातीचे पिंड दिले. मी ते मातीचे पिंड घेऊन स्वर्गात परत आलो. काही काळ गेल्या नंतर ती ब्राह्मण स्त्री मृत्युलोकात मृत पावली म्हणजेच तिच्या शरीरत्यागानंतर ती स्वर्गात आली. तिने दिलेल्या पिंडाच्या प्रभावामुळे तिला एक आम्रवुक्ष छायीत घर मिळाले, परंतु तिने सर्व घर रिकामे पहिले. ती घाबरली आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली - हे परमेश्वरा ! मी सर्व व्रत, उपवास करून तुमची आराधना केली आहे तरीसुध्दा माझे घर रिकामे कसे ? याचे कारण काय आहे ?



मी म्हटले - सर्वप्रथम तुम्ही आपल्या घरी जा आणि जेव्हा देव स्त्रिया ( सर्व देवतांच्या पत्नी ) तुम्हाला भेटण्याकरिता तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना षटतिला एकादशी व्रत चे माहात्म्य विचारा. जो पर्यंत षटतिला एकादशीचे माहात्म्य सांगत नाही तो पर्यंत घराचे दार उघडू नका.

परमेश्वराचे हे वचन ऐकून ती आपल्या घरी आली. जेव्हा देव स्त्रियां तिला भेटण्यासाठी आल्या तेव्हा त्यांनी तिला घराचे दार उघडण्यास सांगितले. त्यावेळी ती ब्राह्मण स्त्री म्हणाली - जर का तुम्ही मला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी आला असाल तर आधी मला षटतिला एकादशी चे माहात्म्य सांगण्याची कृपा करावी.

तेव्हा त्यातील एक देव स्त्रीने म्हटले - हीच तुमची ईच्छा असेल तर मी सांगते ते मनपूर्वक श्रद्धेने श्रवण करा. मी तुम्हाला षटतिला एकादशी व्रत आणि त्याचे माहात्म्य पूर्ण विधानासहित सांगत आहे.



जेव्हा त्या देव स्त्री ने षटतिला एकादशीचे संपूर्ण माहात्म्य तिला सांगितले तेव्हा त्या ब्राह्मण स्त्री ने दार उघडले. जेव्हा सर्व देव स्त्रियांनी ब्राह्मण स्त्री ला पहिले तेव्हा ती सर्वांपेक्षा वेगळीच दिसत होती. त्या ब्राह्मण स्त्री ने सुद्धा देव स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे षटतिला एकादशी चा उपवास केला आणि त्याच्या प्रभावाने तिचे घर धन-धान्याने भरून गेले.

अंततः हे पार्थ ! मानवाला अज्ञानाचा, सर्व विकारांचा त्याग करून षटतिला एकादशीचे व्रत, उपवास करायला पाहिजे. जेणे करून षटतिला एकादशीचे व्रत करणाऱ्या मानवाला जन्मोजन्मांतर निरोगी राहण्याचे वरदान प्राप्त होते. या उपवासाने मानवाचे सर्व पाप नष्ट होतात.



कथेचे सार :-
         इथे हा उपवास केल्याने जिथे आपल्याला शारीरिक पावित्र आणि निरोगीपणा प्राप्त होतो. तसेच अन्न, फळ , तीळ इत्यादी दान केल्याने धन-धान्यामध्ये वृध्दी होते. इथे हे सिध्द होते कि मानव जसे जसे आणि ज्याप्रकारे दान करतो, मृत्यू नंतर त्याला फळ हि तसे तसे प्राप्त होते. सरते शेवटी धार्मिक कृत्यांबरोबर आपल्याला दान धर्म इत्यादी अवश्य केले पाहिजे. शास्त्रामध्ये हे नमूद आहे कि विना दान धर्म केल्याशिवाय कोणते हि धार्मिक कार्य संपन्न होत नाही.

 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 

आपल्यासाठी अजून काही उपयुक्त लिंक्स आम्ही देत आहोत. त्याचा आपण पुरेपूर उपभोग घ्यावा.








Comments

Popular posts from this blog

कलियुगातील मनुष्याना त्वरित फळ देणारे व्रत सफला एकादशी, सफला एकादशी कथा, सफला एकादशी व्रत, Safala Ekadashi