Posts

Showing posts from December, 2019

धन धान्याने समृध्द करणारी एकादशी. " षटतिला एकादशी " २० जानेवारी २०२०

Image
धन धान्याने समृध्द करणारी एकादशी.   " षटतिला एकादशी "   भगवान श्री कृष्णांच्या मुखाने एकादशीचे माहात्म श्रावण केल्यावर त्यांना श्रद्धापूर्वक नमन करून अर्जुन म्हणाला - हे केशव ! आपण सांगितलेल्या एकादशीच्या कथा ऐकल्यावर मला खूप आनंद झाला आहे. हे मधुसूदन ! कृपा करून मला बाकीच्या एकादशी बद्दल माहिती सांगण्याची कृपा करावी. " हे अर्जुन ! आता मी माघ मासातील कृष्णपक्षातील षटतिला एकादशी व्रता बद्दल सांगतो आहे. एकवेळी दालभ्य ऋषीमुनींनी पुलस्त्य ऋषीमुनींना विचारले - हे श्रेष्ठ मुनी ! मनुष्य मृत्यू लोकांत  ब्रह्महत्या , भूणहत्या , चोरी , दुसऱ्याच्या उन्नती बद्दल ईर्षा इत्यादी महापाप करीत आहेत. हे महापाप सर्व क्रोध , ईर्षा आणि न विचार करीता अजाणतेपोटी किंवा जाणूनबुजून करीत आहेत. तदनंतर हे महामुनी ! मी हे काय केले याचे दुःख करीत बसतात. अश्या या मानवांना नर्क प्राप्ती तर नक्कीच होणार. तरी हे महामुनी अश्या या मानवांना नरकात जाण्यापासून वाचविण्या करिता काही उपाय आहे का ? असा काही उपाय ज्यामुळे मानवाला नरकात जाण्यापासून बचाव होईल म्हणजेच नर्क प्राप्ती होणार

कलियुगात सर्वगुण संपन्न पुत्र प्राप्ती चे उत्तम साधन म्हणजे पुत्रदा एकादशी व्रत - ०६ जानेवारी २०२०

Image
पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा श्रीकृष्णाच्या चरणी अर्जुनाने नतमस्तक होऊन प्रार्थना केली - "हे मधुसूदन" !   कृपया पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे महत्त्व सांगा. या एकादशीचे नाव काय आहे ? या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते ?   कृपया माझ्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन मला आशीर्वादित करा. अर्जुनाच्या प्रश्नावर श्रीकृष्ण म्हणाले- "हे अर्जुन ! पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे. पूर्वी सांगितलेल्या पद्धतीनुसार त्याची पूजा केली जावी. भगवान श्रीहरीची उपासना या व्रतात करावी. जगात पुत्रदा एकादशी उपवासाप्रमाणे दुसरा उपवास नाही.त्यामुळे जीव तपस्वी , विद्वान आणि श्रीमंत होतो.   मी तुम्हाला या एकादशीशी संबंधित कथा सांगतो आहे , तुम्ही ती श्रद्धापूर्वक श्रवण करा. पुरातन काळात सुकेतुमान नावाचा राजा भद्रावती राज्यावर राज्य करीत होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते. त्या पुत्ररहित राजाच्या मनात एक चिंता सतत येत होती की आपल्यानंतर   आपल्याला आणि आपल्या पूर्वजांना कोण पिंडदान देईल ? सुकेतुमा

कलियुगातील मनुष्याना त्वरित फळ देणारे व्रत सफला एकादशी, सफला एकादशी कथा, सफला एकादशी व्रत, Safala Ekadashi

Image
सफला एकादशी व्रत कथा मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकून अर्जुन प्रसन्न झाला आणि म्हणाला- “ हे कमलनयन ! मोक्षदा एकादशीची उपवास कथा ऐकून मला धन्यता वाटली. हे मधुसूदन ! कृपया पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीचा महिमा सांगण्याची कृपा करावी. त्या एकादशी चे नाव काय आहे ? त्या एकादशीला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि त्याचे व्रत करण्यासाठी कोणते यम , नियम काय आहेत ?  कृपया मला हे सर्व तपशील सांगण्याची कृपा करावी. अर्जुनाची उत्सुकता ऐकून श्रीकृष्ण म्हणाले- "हे कुंतीपुत्र ! तुझ्या प्रेमामुळे मी तुझ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतो. आता या एकादशीचे व्रत माहात्म्य ऐका- हे पार्थ !  या एकादशीच्या माध्यमातून भगवान श्री विष्णूला तुम्ही लवकरच प्रसन्न करून घेऊ शकता. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला ' सफला एकादशी ' म्हणतात.  या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत. एकादशीच्या दिवशी श्री नारायण यांची श्रद्धापूर्वक उपासना त्यांच्या नियमानुसार करावी. एकादशीला उपवास ठेवणारी व्यक्ती भगवान श्रीहरींना खूप प्रिय आहे. हे पांडू पुत्र  ! हे सत्य मानावे कि जसे नागांमध्ये